नवी दिल्ली | (सद्वार्ता)
अखिल भारतीय मारवाडी गुजराती सोशल कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष, IHCAC चे राज्याध्यक्ष, एमएसबाना प्रा. लि. चे अध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय अॅक्युप्रेशर सल्लागार डॉ. अजित बागमार यांना सामाजिक, आरोग्य व समग्र उपचार (Holistic Health) क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल Holistic Health Science विषयातील मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) प्रदान करण्यात आली.
हा सन्मान Virtual Autonomous University, East West University आणि MIK University (USA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष समारंभात बहाल करण्यात आला. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. एल. किरकिरे, MIK University चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. माईक लिटमन, रजिस्ट्रार हर हायनेस प्रिन्सेस एमिली गुयेन (USA) तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ डॉ. एस. जे. शांडिल्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
याच कार्यक्रमादरम्यान डॉ. अजित बागमार यांच्या आरोग्य जनजागृती, अॅक्युप्रेशर, सामाजिक सेवा आणि लोककल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांना United Gurukul Foundation आणि International Honoris Award Council (USA) यांच्या वतीने प्रतिष्ठेचा Global Guru Award देखील प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. जे. शांडिल्य यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
डॉ. बागमार यांनी अनेक वर्षांपासून अॅक्युप्रेशर, समग्र आरोग्य विज्ञान, सामाजिक सेवा आणि जनजागृतीच्या माध्यमातून देशभरात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांना हे दोन्ही प्रतिष्ठित सन्मान बहाल करण्यात आले.
या दुहेरी सन्मानाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. अजित बागमार यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.